विकासाचा पारदर्शक e-अहवाल
प्रभाग क्रमांक १
(कळस-धानोरी-लोहगाव उर्वरीत)
नागरिकांच्या गरजांवर आधारित पायाभूत सुविधा, सेवा आणि विकासकामांचा सविस्तर व वस्तुनिष्ठ आढावा
प्रभाग क्रमांक १ :
ठळक विकासकामांचा आढावा
भौतिक सुविधा व पायाभूत विकास
शैक्षणिक विकास
क्रीडा सुविधा
उद्याने व सांस्कृतिक सुविधा
महिला सक्षमीकरण
पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण
भावी प्रकल्प
भौतिक सुविधा व पायाभूत विकास
प्रभाग क्रमांक १ मधील मूलभूत गरजांवर केंद्रित विकासकामे
पाणीपुरवठा
दीर्घ प्रयत्नांचे फलित
भामा आसखेड प्रकल्पाचा सातत्याने 7–8 वर्ष अखंड पाठपुरावा करून हा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वीरित्या मार्गी लावला.
वाढीव पाणी साठा क्षमता
मुंजाबावस्ती, धानोरी आणि कळस येथे 25 लाख लीटर क्षमतेच्या चार भव्य पाण्याच्या टाक्यांची उभारणी करून वाढत्या जलगरजांची प्रभावी पूर्तता सुनिश्चित केली.
पाणीपुरवठा अधिक सक्षम
पाणीपुरवठा सुरळीत आणि सातत्यपूर्ण राहावा यासाठी संपूर्ण जलपुरवठा यंत्रणेची व्यापकपणे मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली.
“घराघरांत निर्मळ पाणी हेच आमचं प्राधान्य”
रस्ते व दळणवळण
- अनेक महत्त्वाचे डीपी रस्ते खुले करून वाहतुकीची कोंडी कमी केली.
- प्रभागातील रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण आणि दुरुस्तीचे मोठ्या प्रमाणात काम पूर्ण.
- विश्रांतवाडी मुख्य चौकातील उड्डाणपुल (फ्लायओव्हर)
- पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रभागातील फुटपाथची कामे पूर्ण करण्यात आली
“योग्य रस्ते व सुलभ दळणवळण”
ड्रेनेज व्यवस्था
- जुन्या, अरुंद आणि जीर्ण झालेल्या लाईन बदलून मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज व मलवाहिन्या बसविल्या.
- पाण्याची गळती व अडथळे दूर करून सेप्टिक समस्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या.
- प्रभागासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची मान्यता (STP)
प्रकाशयोजना
अनेक भागातील विद्युत तारा भूमिगत करण्यात आल्या.
नवीन विद्युत पोल, LED स्ट्रीटलाईट बसवून रात्रीची सुरक्षा वाढवली.
शैक्षणिक विकास
प्रभाग क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपक्रम
- मुंजाबावस्तीत अत्याधुनिक इंग्रजी माध्यम ई-लर्निंग स्कुल उभारली (दर्जेदार मोफत शिक्षण व सुविधा).
- गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व शैक्षणिक प्रोत्साहन उपक्रम.
- गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे उपक्रम
"विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविधा आणि उज्ज्वल भविष्य"
क्रीडा सुविधा
प्रभाग क्रमांक १ मधील आरोग्यदायी व सक्रिय जीवनशैलीसाठी सुविधा
युवकांना क्रीडाक्षेत्रामध्ये संधी मिळावी म्हणून –
- जलतरण तलावाची निर्मिती
- बॅडमिंटन कोर्टचे निर्मिती
- महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन
- खेळाडूंना व तरुणांना प्रोत्साहन देणारे उपक्रमाचे आयोजन
“खेळाडूंना योग्य संधी व योग्य सुविधा”
उद्याने व हरित सुविधा
नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सामूहिक उपक्रमांसाठी
- ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र
- मल्टीपर्पज हॉलची निर्मिती
“नागरिकांच्या सहभागाने सशक्त व्यासपीठ”
महिला सक्षमीकरण
कौशल्यविकास व स्वावलंबन
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्यविकास, स्वयंरोजगार व व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विविध प्रशिक्षण वर्गांचे सातत्याने आयोजन करण्यात आले.
सांस्कृतिक सहभाग व सामाजिक एकोपा
महिलांमध्ये सामाजिक एकोपा, मानसिक समाधान व सांस्कृतिक सहभाग वाढावा यासाठी नियोजित स्वरूपात देवदर्शन यात्रांचे आयोजन करण्यात आले.
सन्मान व प्रोत्साहन
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून इतर महिलांना प्रेरणा देणारे सन्मान सोहळे व विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
आर्थिक सक्षमीकरण
लाडकी बहिण योजनेअंतर्गत हजारो महिलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देत त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रभावी सहकार्य करण्यात आले.
“महिलांच्या सक्षम भविष्यासाठी पुढाकार”
आरोग्यसेवा
“आरोग्यसेवेतून सुरक्षित आणि सक्षम प्रभाग.”
कोरोना काळातील सेवा
- स्वखर्चातून हजारो नागरिकांना लसीकरण
- औषधफवारणी, स्वच्छता मोहिमा
- हँड सॅनिटायझर मशीन बसविणे
- मजूर व कष्टकरी वर्गासाठी अन्नदान
- गरजूंना धान्यवाटप
- सार्वजनिक स्वच्छता उपक्रम
“संकटकाळात अविरत सेवा - नागरिकांच्या पाठीशी ठामपणे.”
सामाजिक सुरक्षा व सुविधा
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, सेवेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी राबवलेले महत्त्वपूर्ण उपक्रम
धानोरी स्मशानभूमीचे आधुनिकीकरण
नागरिकांना सन्मानपूर्वक व सुसुविधायुक्त अंत्यसंस्काराची सुविधा मिळावी यासाठी धानोरी स्मशानभूमीचे सर्वांगीण आधुनिकीकरण करण्यात आले.
पुरग्रस्त व आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत
पूर, आपत्ती किंवा संकटाच्या काळात बाधित कुटुंबांना तात्काळ मदत, साहित्य व आवश्यक सहकार्य प्रदान करण्यात आले.
धानोरी पोलिस स्टेशन व पोस्ट ऑफिस उभारणे
धानोरी येथे पोलिस चौकी उभारून कायदा-सुव्यवस्था बळकट केली असून, पोस्ट ऑफिसद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मोफत शासकीय दाखल्यांचे वाटप
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सुलभतेने मिळावा यासाठी विविध शासकीय दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
“सुरक्षा, सेवा आणि विश्वास - सर्वसामान्यांच्या पाठीशी.”
पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण
प्रभागातील हरित क्षेत्र वाढवणे आणि स्वच्छ–सुंदर परिसर घडवणे हे माझ्या कामाचे महत्त्वाचे ध्येय राहिले आहे
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
- प्रभागातील विविध सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला आणि धानोरी नागरी वन उद्यान परिसरात हजारो झाडांची लागवड.
- “हरित धानोरी” अंतर्गत सतत वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम
- लागवड केलेल्या झाडांना नियमित पाणी, कुंपण व देखभालीची सोय.
- प्रभागात सुमारे ५,५०० हून अधिक झाडे लावली व त्यांचे संवर्धन केले
“स्वच्छ, हरित व शाश्वत प्रभागाचासंकल्प”
मॅरेथॉनद्वारे हरित संदेश
(GREEN DHANORI MARATHON 2025)
- GREEN DHANORI MARATHON च्या माध्यमातून १०,००० पेक्षा अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश दिला.
- धानोरी नागरी वन उद्यानाच्या विकासाचा नागरिक सहभागातून भक्कम पाया
- ७० एकरांपेक्षा अधिक क्षेत्राचा विकास करून संघटित नागरी वन उभारणीस चालना देण्यात आली.
"एक कदम प्रगति का, एक पेड़ प्रकृति का"
भविष्यातील प्रकल्प
जनतेच्या दीर्घकालीन हितासाठी राबविण्यात येणारे प्रस्तावित प्रकल्प
- प्रभागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी अत्याधुनिक महापालिका हॉस्पिटल उभारण्याचा ठाम संकल्प.
- वाहतूक कोंडी कमी होऊन दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी विश्रांतवाडी परिसरात नियोजित मेट्रो सेवा आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा.
- हरित क्षेत्र वाढवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पुणे शहरातील सर्वांत मोठे ‘धानोरी नागरी वन उद्यान’ विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
- खेळाडूंच्या भविष्याला गती देण्यासाठी आधुनिक इनडोअर क्रीडा संकुल उभारणार
- माजी सैनिकांच्या सन्मानासाठी माजी सैनिक सदन उभारणार
“आजचा नियोजनबद्ध विचार - उद्याचा शाश्वत विकास.”
लोहगाव सर्वांगीण विकास : सुविधा, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या आयोजनामुळे प्रसिद्ध असलेल्या लोहगाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य
लोहगाव परिसरातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट व पादचारी मार्ग (फुटपाथ) यांसारख्या मूलभूत सुविधांचे नियोजनबद्ध व दर्जेदार उभारणीकार्य करण्यावर विशेष भर दिला जाईल.
पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध
लोहगावमधील गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे पाणीप्रश्न.
प्रत्येक कुटुंबाला पुरेसे, स्वच्छ व नियमित पाणी मिळावे हेच माझे सर्वोच्च प्राधान्य राहील. यासाठी दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना राबविण्यात येतील.
नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेस प्राधान्य
नागरिकांची सामाजिक सुरक्षा वाढवणे तसेच सुरक्षित व भयमुक्त वातावरण निर्माण करणे यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जातील.
क्रीडा संकुल व शैक्षणिक सुविधा विकासावर भर
तरुणाईच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक क्रीडा संकुल, शाळा व शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात येईल.
“स्वच्छ • सुरक्षित • समृद्ध लोहगावसाठी कटिबद्ध”
विकासाचा निर्धार
विकास हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू असून, केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारा लोकप्रतिनिधी म्हणून प्रभाग क्रमांक १ (कळस – धानोरी – लोहगाव उर्वरित) मधील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध व लोकाभिमुख कामे करण्यात आली आहेत.
या कार्यप्रवासात मला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच मुख्य म्हणजे आमच्या माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या सदस्य व प्रभागातील जागरूक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासास न्याय देत, उर्वरित विकासकामेही प्राधान्याने पूर्ण करून प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्याचा हा प्रवास यापुढेही अखंडपणे सुरू राहील.
धन्यवाद!
“आश्वासनांपेक्षा कामांवर विश्वास.”
Designed & Developed by Yukti Web Studio
